साताऱ्यात 8 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक, कराडमध्ये मतदानाला सुरूवात

| Updated on: Apr 30, 2023 | 10:58 AM

VIDEO | सातारा जिल्ह्यातील 8 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू, शांततेत मतदानाला सुरुवात

सातारा : सातारा जिल्ह्यातील 8 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.  सकाळी शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सातारा, लोणंद, कराड, वाई, पाटण, कोरेगाव, वडूज, फलटण या बाजार समितीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. सातारा आणि कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महत्वपूर्ण समजली जात आहे. तर सातारा तालुक्यात 4 हजार 401 मतदार, वडूजमध्ये 4 हजार 230 मतदार, लोणंदमध्ये 1 हजार 796 मतदार, वाईमध्ये 2 हजार 388 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर फलटणमध्ये 2 हजार 941 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासह कोरेगावात 3 हजार 123 मतदार आहेत. कराडमध्ये 4 हजार 209, मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याबरोबरच पाटणमध्ये 4 हजार 273 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे नुकतीच सातारा जिल्ह्यातील 8 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असताना निकाल नेमका काय लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

Published on: Apr 30, 2023 10:58 AM
आगामी निवडणुकीत जनता शिंदेगटाचा करेक्ट कार्यक्रम करणार; संजय राऊतांचा निशाणा
महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद अन् जयंत पाटलांचं वक्तव्य; सुजय विखे पाटील यांचं जोरदार टीकास्त्र