छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर राजकीय सभांचा धूमधडाका, कोण-कोणत्या पक्षांनी केले अर्ज?
छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर राजकीय सभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी अर्ज केले असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांचे मुंबई महापालिकेकडे राजकीय सभा आणि मेळावे घेण्यास परवानगी देण्यासंदर्भात अर्ज
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर राजकीय सभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी अर्ज केले असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांचे मुंबई महापालिकेकडे राजकीय सभा आणि मेळावे घेण्यास परवानगी देण्यासंदर्भात अर्ज करण्यात आले आहे. १७ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान मिळावं यासाठी मनसे आणि ठाकरे गटाचा अर्ज पालिकेकडे देण्यात आला आहे. तर १६, १९ आणि २१ एप्रिलला मैदान मिळवण्यासाठी शिंदे गटाचा अर्ज पालिकेकडे गेलाय. पुन्हा शिंदे गटाचे ३, ५ आणि ७ मे रोजी प्रचार सभांसाठी शिंदे गटाने पालिकेकडे अर्ज केलाय. मनसे, ठाकरे गट, शिंदे गटासह राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील मुंबई महापालिकेकडे छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान मिळावं म्हणून अर्ज देण्यात आलाय. २२, २४ आणि २७ एप्रिल रोजी प्रचार सभा घेण्यास परवानगी संदर्भात अजित पवार गटाकडून अर्ज देण्यात आलाय.