संजय राऊत, संजय पवारांकडून राज्यसभेचा अर्ज दाखल
राज्यसभेच्या सहा जागांपैकी शिवसेना (Shiv Sena) दोन जागा लढवणार असून यासाठी आज शिवसेनेच्या वतीने संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) यांनी अर्ज भरला.
राज्यसभेच्या सहा जागांपैकी शिवसेना (Shiv Sena) दोन जागा लढवणार असून यासाठी आज शिवसेनेच्या वतीने संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) यांनी अर्ज भरला. निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीचे सर्व खासदार, आमदार यावेळी उपस्थित होते. शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या वतीनं यावेळी मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. राज्यसभेच्या सहा जागांपैकी महाविकास आघाडी चार जागांवर विजय मिळवून दाखवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.