पैलवानांनाही मिळणार अपघात विमा कवच? पैलवान अमोल बूचडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे काय केली मागणी?
VIDEO | 'राज्यातील पैलवानांनाही दहीहंडी खेळाच्या धर्तीवर अपघात विमा कवच लागू करा', पैलवान अमोल बूचडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
मुंबई, २४ ऑगस्ट २०२३ | राज्यातील पैलवानांनाही दहीहंडी खेळाच्या धर्तीवर अपघात विमा कवच लागू करा, अशी मागणी रुस्तम ए हिंद पैलवान अमोल बूचडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. पैलवान अमोल बूचडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत जाऊन भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात निवेदन देखील दिले. हे निवेदन पैलवान अमोल बूचडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्यानंतर राज्य सरकार यावर सकारात्मक विचार करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. कुस्ती खेळत असताना अनेक पैलवानांना शारीरिक दुखापतीला सामोरं जावं लागतं, त्यामुळे अपघात विमा कवच लागू करण्याची मागणी पैलवान अमोल बूचडे यांनी मुंबईत दाखल होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली. दरम्यान, राज्याच्या क्रीडा खात्यातर्फे एक परिपत्रक जारी करुन राज्यातील 50 हजार गोविंदांना अपघात विम्याचे कवच देण्यात आले आहे. 50 हजार गोविंदांचा विमा उतरवण्यासाठी 37 लाख 50 हजार देण्यात आले आहेत. तर राज्य सरकारने ठरवल्याप्रमाणे यंदापासून प्रो-लीग गोविंदा स्पर्धाही होणार असल्याचे सांगितले जात आहे.