…म्हणून आम्हाला फडणवीस आवडले, सदाभाऊ खोत यांच्याकडून फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव
सदाभाऊ खोत यांच्याकडून फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं! म्हणाले, ...
माजी मंत्री आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर कौतुकाचा वर्षावर केल्याचे समोर आले आहे. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस का आवडतात याचे त्यांनी थेट कारण देत स्पषट सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस कोणतीही संस्था काढत नाही, म्हणून आम्हाला ते आवडतात असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. तर फडणवीस असे एकमेक नेते आहेत, जे प्रस्थापितांची चांगलीच जिरवू शकतात, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी फडणवीसांवर कौतुकाची स्तुती सुमनं उधळली आहे. सुत गिरणी, बँका, शाळा, साखर कारखाने, हॉस्पिटल काढत नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याने आमच्या लक्षात आले की, फडणवीस आमच्या कामाचे आहेत. आमचा विरोध प्रस्थापितांना होता. आम्हाला गडी मिळाला आणि आम्ही हातात हात घातले, असे म्हणत फडणवीस यांची स्तुती केली आहे.
Published on: Jan 28, 2023 03:12 PM