Hari Narke | देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या वकिलांच्या पदव्या बोगस आहेत काय ? : हरी नरके
देशातलंच ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झालंय. फक्त महाराष्ट्रातचं आरक्षण रद्द झालं हा खोटा प्रचार दोघे करतायेत. दोघांनाही कोर्टात खेचायला हवं, असं म्हणत हरी नरकेंनी देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांवर टिका केली आहे.
देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या वकिलीच्या पदव्या बोगस आहेत काय ? ओबीसी अभ्यासक हरी नरकेंचा फडणवीसांना सवाल केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत ते जो प्रचार करतायेत हे पाहून बोगस पदव्या असल्याची शंका येते, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय राज्यघटनेच्या कलम 142 खाली दिलेला आहे. देशातलंच ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झालंय. फक्त महाराष्ट्रातचं आरक्षण रद्द झालं हा खोटा प्रचार दोघे करतायेत. दोघांनाही कोर्टात खेचायला हवं, असं म्हणत हरी नरकेंनी देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांवर टिका केली आहे.