Kolhapur | अर्जेंटिनाच्या विजयानंतर कोल्हापुरकरांचा जल्लोष

| Updated on: Jul 11, 2021 | 11:31 AM

कोपा अमेरिका चषक 2021 मध्ये फायनलचा सामना जगातील अव्वल क्रमाकांचे खेळाडू मेस्सी आणि नेयमार याच्या अर्जेंटीना विरुद्ध ब्राझील संघात रंगला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या संपूर्ण सामन्यात अर्जेंटीना संघाने विजय मिळवला आणि त्याचं सेलेब्रेशन कोल्हापूरात होताना दिसलं

अमेरिकन देशातील सर्वात मानाची आणि महत्त्वाची फुटबॉल स्पर्धा असणाऱ्या कोपा अमेरिका चषकाचा अंतिम सामना (Copa America 2021 Final) अखेर पार पडला. अनेक वर्षांपासून कोपा अमेरिका स्पर्धा गाजवणारे अर्जेंटीना आणि ब्राझील हे संघ आमने-सामने होते. त्यात दोन्ही संघातील महत्त्वाचे खेळाडू ही फुटबॉल जगतातील बेस्ट खेळाडू लिओनल मेस्सी (Lionel Messi) आणि नेयमार (Neymar) असल्याने या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात अखेर मेस्सीच्या अर्जेंटीना संघाने 1-0 च्या फरकाने विजय मिळवत सामना आपल्या नावे केला.

विशेष म्हणजे या विजयानंतर अर्जेंटीना संघाने विजय तिकडे ब्राझीलमध्ये मिळवला आणि त्याचा उत्साह इकडे महाराष्ट्रातल्या कोल्हापूर शहरात दिसून आला. कोल्हापूर कायमच फुटबॉल खेळासाठी प्रसिद्ध असून इथे अंतर्गत अनेक संघ फुटबॉल सामने खेळतात. यातीलच एक संघ खंडोबा तालीम मंडळ यांनी अर्जेंटीनाचा विजय साजरा करत नाचून धिंगाणा केला.

Nana Patole : मी बोललो तर त्रास झाला, ते बोलले तर चालतं, स्वबळावरुन नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
Sanjay Rathod Exclusive | वनमंत्री पदाबाबत शिवसेनेचे नेते संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया