मनोज जरांगे पाटील यांनी काढले छगन भुजबळ यांचे संस्कार; म्हणाले… तुम्ही काय शिकवणार?

| Updated on: Dec 26, 2023 | 2:58 PM

कोयता, कुऱ्हाडीची भाषा करणारे संस्कार शिकवणार का? असा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर छगन भुजबळ यांच्या अनुभवावरून त्यांचे संस्कार कळाले, असे म्हणत खोचक टीकाही जरांगेंनी केली.

मुंबई, २६ डिसेंबर २०२३ : कोयता, कुऱ्हाडीची भाषा करणारे संस्कार शिकवणार का? असा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर छगन भुजबळ यांच्या अनुभवावरून त्यांचे संस्कार कळाले, असे म्हणत खोचक टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर केली. ‘त्यांचे मित्र बघितले कोण पिस्तुलवाले आहेत. २०० बेकायदा पिस्तुलांची आयात जालन्यात झाली आहे. तिथे वाळू माफिया आहेत. ही मंडळी जवळ असली तर जरांगे पाटील काय शिकणार?’, असा खोचक सवाल करत भुजबळांनी हल्लाबोल केला तर यावर जरांगे पाटील यांनी पलटवार करत म्हटले, कोयता, कुऱ्हाडीची भाषा करणारे संस्कार शिकवणार का? त्यांच्या अनुभवावरून त्यांचे संस्कार कळाले, असेही त्यांनी म्हटले.

Published on: Dec 26, 2023 02:58 PM
साताऱ्यातील सार्वजनिक शौचालयात रात्री महिलांना असं काय दिसलं की त्यांची बोबडीच वळली, नेमकं काय घडलं?
अमोल कोल्हे यांच्या पराभवासाठी अजितदादा गटातून ‘हा’ खंदा पाठीराखा शिरूर लोकसभेची जागा लढवणार?