Vinayak Raut Vs Narayan Rane | कुंडली बाहेर काढण्यावरुन कोकणात धुमशान

Vinayak Raut Vs Narayan Rane | कुंडली बाहेर काढण्यावरुन कोकणात धुमशान

| Updated on: Aug 27, 2021 | 6:39 PM

भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? रमेश मोरे, जया जाधवची हत्या कशी झाली? आम्हालाही जुनी प्रकरणं माहीत आहेत. सर्व जुनीप्रकरणं टप्याटप्याने बाहेर काढणार, आवाज खणखणीत झाला की खणखणीत वाजवणार, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

रत्नागिरी : केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला ललकारले आहे. भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? रमेश मोरे, जया जाधवची हत्या कशी झाली? आम्हालाही जुनी प्रकरणं माहीत आहेत. सर्व जुनीप्रकरणं टप्याटप्याने बाहेर काढणार, आवाज खणखणीत झाला की खणखणीत वाजवणार, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. रत्नागिरीत भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना नारायण राणे यांनी हा इशारा दिला. आता जुन्या गोष्टी काढणार आहेत. काढा ना… दोन वर्षे झाली. शोधत आहेत. काढत आहेत. काढाना… आम्हालाही जुन्या गोष्टी माहीत आहे. रमेश मोरेची हत्या कशी झाली? त्याचं कारण काय आहे. जया जाधवची हत्या कशी झाली? त्याचं कारण काय आहे. माहीत आहे. आपल्याच बंधुच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कोणी सांगितलं? कोणाला सांगितलं? आणि संस्कार. असे संस्कार. आपल्याच भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकण्याचे… मी टप्याटप्याने सर्व काढणार. सुशांतची केस संपली नाहीये. दिशा सालियनचीही संपली नाही. मी केंद्रात मंत्री आहे. जरा आठवण करा. रिस्ट्रिक्शन देऊन काय करणार. अटक? किती दिवस. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे हे लक्षात ठेवा, असं दमच राणेंनी भरला.

Narayan Rane | विचारधारा स्वीकारुनच भाजपत प्रवेश केला : नारायण राणे
Video | नारायण राणे यांच्या घराबाहेर राडा, आदित्य ठाकरेंकडून बक्षीस, कोण आहे मोहसीन शेख ?