तलाठी परिक्षेत घोटाळा? परिक्षेवरून राधाकृष्ण विखे पाटील आणि रोहित पवार यांच्यात जुंपली
पेपरफुटीनंतर आता निकालातही घोटाळ्यांचे आरोप होऊ लागले आहेत. तलाठी भरती घोटाळ्याची एसआटी मार्फत चौकशी करा, या मागणीवर विरोधक आक्रमक झालेत. तर खोटे आरोप कराल तर गुन्हे दाखल करू, अशाप्रकरचा इशारच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय.
मुंबई, १२ जानेवारी २०२४ : पेपरफुटीनंतर आता निकालातही घोटाळ्यांचे आरोप होऊ लागले आहेत. मात्र परिक्षेवर आरोप करून सरकारची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करू, असा इशाराच राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिलाय. तलाठी भरती घोटाळ्याची एसआटी मार्फत चौकशी करा, या मागणीवर विरोधक आक्रमक झालेत. तर खोटे आरोप कराल तर गुन्हे दाखल करू, अशाप्रकरचा इशारच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय. पेपरफुटीबद्दल ९ सप्टेंबर रोजी एका वृत्त संस्थेने तलाठी परिक्षेत केंद्रावरील कर्मचारी उत्तरे पुरविण्यासाठी घेतात ती लाख रुपये…अशी हेडलाईन केली होती. तर दुसऱ्या वृत्त संस्थेने दहा लाखात तलाठी व्हा, थेट परीक्षा केंद्रात उत्तरपत्रिका मिळवा…परीक्षा सुरू होताच १६ व्या मिनिटाला प्रश्नपत्रिका आली बाहेर, एकाला अटक…अशी हेडलाईन केली. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यामते परीक्षा पारदर्शक झाली आणि गैरप्रकराचे पुरावे असल्यास आरोप करणाऱ्यांनी द्यावेत. यावरून सत्ताधारी कसे पुरावे मागताय असा आक्षेप घेतला जातोय.