‘लाडक्या बहिणी’चा प्रचार अन् श्रेयवादावरून ‘भावां’मध्येच वॉर? महायुतीत वादाची ठिणगी?

| Updated on: Sep 10, 2024 | 11:21 AM

बारामतीतून अजित पवार लढणार की नाही. यावरुन वाद रंगलेला असताना लाडक्या बहिणीवरुन महायुतीत पडलेली वादाची ठिणगी वाढत चालल्याचा दावा केला जातोय. फडणवीसांच्या देवाभाऊ नावाच्या पोस्टरवर शिंदेंचा फोटो असला तरी अजित पवारांचा फोटो गायब झालाय.

Follow us on

बारामतीत स्वतःच्या उमेदवारीबद्दल सस्पेन्स तयार करणारे अजित पवार यंदा पराभूत होणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. बारामतीला एकदा दुसरा आमदार मिळू द्या. त्यानंतर आपली किंमत लक्षात येईल, अशा आशयाचं विधान अजित पवारांनी काल केलं होतं. त्यावरुन अजित पवार यंदा लढणार की नाही., याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर अजित पवार आमचे कॅप्टन असल्यामुळे ते शस्र टाकणार नाही, असं म्हणत भुजबळांनी अजित पवार बारामतीतूनच लढतील, असे संकेत दिलेत. तर दुसरीकडे निधीच्या नाराजीबरोबरच लाडकी बहीण योजनेचं श्रेय महायुतीतल्या तणातणीसाठी मुख्य कारणीभूत ठरत असल्याची चर्चा आहे. योजनेचं मूळ नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, ज्याचा उल्लेख शिंदे समर्थक पोस्टरद्वारे करतात अजित पवारांच्या पोस्टरवर मुख्यमंत्री शब्द गायब असून फक्त लाडकी बहिण लिहिलं जातंय, पुढे दादांचा वादा म्हणूनही शब्द आहेत तर फडणवीसांच्या पोस्टरवर देवाभाऊ…लाडक्या बहिणीला महिन्याला 1500 देणार म्हणून उल्लेख केला जातोय. या पोस्टरवर फडणवीसांसह मोदी आणि-शिंदेंचा फोटो असून अजित पवार मात्र गायब आहेत.