लेहमध्ये मोठी दुर्घटना, भारतीय सैन्याचं वाहन दरीत कोसळलं अन्…
VIDEO | लेहमध्ये मोठी दुर्देवी घटना, भारतीय सैन्याचं वाहन दरीत कोसळलं, सर्व जवान कारु गॅरीसन येथून लेहच्या क्यारी शहाराच्या दिशेला जात असताना घडली घटना, या दुर्घटनेत गाडीतील सर्व 9 जवान शहीद
लडाख, १९ ऑगस्ट २०२३ | लेहमधून एक मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. भारतीय सैन्याच्या एका ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या ट्रकमध्ये 2 ज्युनियर कमिशन ऑफिसर आणि 7 जवान होते. क्यारी शहरापासून 7 किमी अंतरावर अपघाताची दुर्घटना घडली. भारतीय सैन्याचं ट्रक थेट दरीत कोसळलं. या दुर्घटनेत गाडीतील सर्व 9 जवानांचा मृत्यू झाला. हे सर्व जवान कारु गॅरीसन येथून लेहच्या क्यारी शहाराच्या दिशेला जात होते. यावेळी ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, माहितीनुसार, भारतीय सैन्याची एक रुग्णवाहिका आणि आणखी काही वाहनं क्यारी शहाराच्या दिशेला जात होती. या दरम्यान एका ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रक थेट दरीत कोसळला. या अपघातात ट्रकमधील सर्व 9 जवान शहीद झाले. एकूण 34 जवान क्यारी शहराच्या दिशेला जात होती. त्यापैकी 9 जणांचा दुर्देवी अपघातात मृत्यू झाला आहे.
Published on: Aug 19, 2023 11:47 PM