Narayan Rane Arrest | नारायण राणेंवर केलेली कारवाई बेकायदेशीर, नारायण राणेंच्या वकिलांचा दावा

| Updated on: Aug 24, 2021 | 7:05 PM

राणे यांच्यावर केलेली कारवाई ही बेकायदेशीर असल्याचे वकिलांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे नारायण राणे यांना महाड न्यायालयात हजर केले जाणार आहे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात राणे यांना हजर केले जाणार आहे. 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आलंय. या अटकेनंतर भाजप नेते तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येतोय. राणे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. राणे यांच्यावर केलेली कारवाई ही बेकायदेशीर असल्याचे वकिलांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे नारायण राणे यांना महाड न्यायालयात हजर केले जाणार आहे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात राणे यांना हजर केले जाणार आहे.

Published on: Aug 24, 2021 07:03 PM
Pravin Darekar | नारायण राणेंच्या अटकेनंतरही जनआशीर्वाद यात्रा सुरु राहणार : प्रवीण दरेकर
Exclusive Video | नारायण राणेंच्या अटकेसाठी अनिल परबांचा फोन, पोलिसांवर दबाव?