‘त्यांना’ अटक करा आणि शांतता प्रस्थापित करा – प्रवीण गायकवाड

| Updated on: May 02, 2022 | 6:50 PM

इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असा दावाही राज ठाकरे यांनी केलाय. राज यांच्या या दाव्यानंतर आता नवा वाद सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी राज ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केलीय.

पुणे : राज ठाकरेंच्या संभाजींनगरमधल्या (Sambhajinagar) सभेनंतर वातावरण चांगलंच तापलंय ! सभेत राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. शरद पवारांनी जातीपातीचं राजकारण (Caste Politics) केलं. इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असा दावाही राज ठाकरे यांनी केलाय. राज यांच्या या दाव्यानंतर आता नवा वाद सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी राज ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केलीय. राज ठाकरे जातीवादाचं राजकारण करत आहेत. राज ठाकरे यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे. राज ठाकरे यांना अटक करुन शांतता प्रस्थापित करा. आम्ही या प्रकरणी शरद पवार यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे खोटा इतिहास पसरवत आहेत, असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केलाय.

 

 

 

नक्कल पाहिली का नक्कल, उपमुख्यमंत्र्यांनी केलेली ?
Special Report | Raj Thackeray यांच्याविरोधात सरकार कारवाईच्या तयारीत? -tv9