माझ्या वडिलांनी अरुण गवळींच्या वडिलांच्या दारू अड्यावर काम केले
अरुण गवळी यांच्या वडिलांचा दारूचा अड्डा होता, त्या दारुच्या अड्यावर माझ्या वडिलांनी काम केले असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
अरुण गवळी यांच्या वडिलांचा दारूचा अड्डा होता, त्या दारुच्या अड्यावर माझ्या वडिलांनी काम केले असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. घरातील माणसांना मदत व्हावी यासाठी माझ्या वडिलांनी अरुण गवळी यांच्या वडिलांच्या दारु अड्यावर काम केले. अरुण गवळी यांच्या वडिलांना वाटलं असेल अड्यातील दारूचे पैसे या लहान मुलाला मोजायला दिले तर तो गल्ला कितीचो होतो हे समजेल असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. ओबीसी राज्यस्तरीय शिबिरात बोलताना त्यांनी ही माहिती सांगितली. दारु अड्यावर किती पैसे जमा होतील हे फक्त लहान मुलगाच सांगू शकेल म्हणून माझ्या वडिलांना अरुण गवळी यांच्या वडिलांनी माझ्या वडिलांनी गल्लयावर ठेवले असे सांगितले.
Published on: Feb 13, 2022 08:49 PM