Video | प्रत्येक भेट राजकीयच असते असे नाही, देशहितासाठीही भेटी होतात : अरविंद सावंत
यावर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक भेट ही राजकीयच असते असे नाही. काही वेळा देशहितासाठी, सामाजिक भेटीही होतात, असे सावंत म्हणाले.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट घेतली आहे. या भेटीपूर्वी पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातसुद्धा भेट झाल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या भेटीगाठीचे नेमके कारण काय असावे असे प्रश्न विचारले जात आहेत. यावर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक भेट ही राजकीयच असते असे नाही. काही वेळा देशहितासाठी, सामाजिक भेटीही होतात, असे सावंत म्हणाले.