पोलिसांचा अपमान करणाऱ्या अरविंद सावतांना तात्काळ अटक करा- अमेय खोपकर

| Updated on: Sep 11, 2022 | 3:57 PM

"पोलिसांचा अपमान करणाऱ्या बेशरम खासदाराचा मी निषेध करतो. पोलिसांचा हा अपमान मनसे सहन करणार नाही. अरविंद सावंतांना तात्काळ अटक करा", अशी मागणी अमेय खोपकर यांनी केली आहे. 

“शून्य कामगिरी पण कार्यकर्त्यांसमोर चंपूगिरी करणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. सणासुदीच्या काळात कुठेही गैरप्रकार होऊ नये, म्हणून सतत दक्ष असणारे आपले मुंबईचे पोलीस पावसापाण्यात, उन्हात.. बाप्पाचा सण निर्विघ्नपणे पार पडणारे हे पोलीस. गेले दहा दिवस ते अहोरात्र मेहनत करत आहेत. तुम्ही त्यांना बोट दाखवतायत. पोलिसांचा अपमान करणाऱ्या बेशरम खासदाराचा मी निषेध करतो. पोलिसांचा हा अपमान मनसे सहन करणार नाही. अरविंद सावंतांना तात्काळ अटक करा”, अशी मागणी अमेय खोपकर यांनी केली आहे.

Published on: Sep 11, 2022 03:57 PM
Shivsena : शिवसेना- शिंदे गटातील राड्याचा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सदा सरवणकरांनी केलेल्या फायरींगबाबत अरविंद सावंतांची प्रतिक्रिया