Arvind Trivedi dies | रावणाची भूमिका अजरामर करणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं निधन
टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘रामायण’मध्ये रावणाची (Ravan) भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi) यांचे निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामानंद सागर यांच्या ‘रामायण मालिके’तील रावणाच्या व्यक्तिरेखेने नव्वदच्या दशकात त्रिवेदींनी प्रेक्षकांवर गारुड केले होते.

अरविंद त्रिवेदी यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) सकाळी मुंबईतील डहाणूकरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ते दीर्घ काळापासून आजारी होते, पण काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची दुःखद बातमी त्यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी दिली.