Aryan Khan Bail | आर्यन खानला सशर्त जामीन मंजूर, सुटकेची नेमकी प्रक्रिया काय?
क्रूझ ड्रग्स प्रकरणात अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयात जवळपास तीन दिवस दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निर्णय घेतलाय. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आला.

आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर शाहरुख खानच्या चाहत्यांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला. चाहत्यांनी मन्नत बंगल्याबाहेर जल्लोष केला. आज जेलमधून सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यायालयाचे आदेश आल्यास आजच आर्यनची सुटका होण्याची शक्यता आहे. आज किंवा उद्या आर्यन खानची जेलमधून सुटका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.