Cruz Drugs प्रकरणात आरोपींचे वकिल म्हणतात, “वेट करा”

| Updated on: Oct 28, 2021 | 6:38 PM

उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, आज जामीन मंजूर करण्यात आला असला तरी हे तिघेही आज कारागृहाबाहेर पडण्याची शक्यता कमी आहे.

बई क्रूझ ड्रग्स प्रकरणात अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात जवळपास तीन दिवस दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निर्णय देण्यात आलाय. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, आज जामीन मंजूर करण्यात आला असला तरी हे तिघेही आज कारागृहाबाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. त्याबाबत आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी माहिती दिलीय. मुंबई उच्च न्यायालयाने तिनही आरोपींना जामीन दिला आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. माननीय उच्च न्यायालयाने जवळपास तीन दिवस दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत उद्या मिळेल आणि मला आशा आहे की हे तिघेही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा शनिवारी बाहेर येतील, अशी माहिती आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी दिली आहे.

Nawab Malik : Aryan Khan ला हायकोर्टाकडून अखेर जामीन मंजूर, नवाब मलिक यांची प्रतिक्रिया
Shahrukh Khan Son Bail | Aryan Khan ला जामीन नेमक्या काय अटींवर मिळाला ?