Rajesh Tope | कोरोना रुग्ण दुपटीने वाढत असल्याने राज्याची चिंता वाढली – राजेश टोपे
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. क्वॉरंटाईन कालावधी किती दिवसांचा असावा इथपासून ते लॉकडाऊन लावावा की लावू नये आदींबाबत आज मोठे निर्णय घेण्यात आल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधला. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आता केवळ आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज नाही तर अँटिजेन टेस्टवर आपण भर देणार आहोत. अँटिजेनच्या टेस्ट वाढवाव्या लागतील. अँटिजेन टेस्ट किट खरेदी केली तर त्याचा हिशोब जिल्हा प्रशासनाला कळवला पाहिजे. अँटिजेनमध्ये किती पॉझिटिव्ह होतात याचा रेकॉर्ड ठरवला पाहिजे. त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत, असं टोपे यांनी सांगितलं.