उत्तर प्रदेशात असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर गोळीबार! ओवेसी सुखरुप

| Updated on: Feb 03, 2022 | 10:56 PM

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात AIMIM चे सर्वेसर्वा आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या गाडीवर गोळीबार (Firing) झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. 

मुंबई : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात AIMIM चे सर्वेसर्वा आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या गाडीवर गोळीबार (Firing) झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (Uttar Pradesh Assembly Election) पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी हे सध्या प्रचार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या गाडीवर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या खुणा त्यांच्या गाडीवर दिसून येत आहेत. मात्र, या हल्ल्यात सुदैवानं कुणीही जखमी झालं नाही. “काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. 4 राऊंड फायर करण्यात आले. 3 ते 4 लोक होते, सर्वजण पळून गेले आणि शस्त्र तिथेच सोडून गेले. माझी गाडी पंक्चर झाली, मात्र मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघालो. आम्ही सर्वजण सुखरुप आहोत”, असं ट्वीट ओवेसी यांनी केलं आहे.

Special Report | लग्नासाठी बॅनर लावलं…आणि तब्बल 5 हजार प्रस्ताव आले?
बंडातात्या कराडकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची महिला आयोगाकडून गंभीर दखल; कारवाईची शक्यता