Asha Bhosle | तुमच्या चरणावर 1 लाख 1 रुपये अर्पण करते, बाबासाहेब पुरंदरेंप्रती आशा भोसलेंची कृतज्ञता
मराठी लेखकांनी माझं आयुष्य समृद्ध केलं, तुमच्या चरणावर 1 लाख एक रुपये अर्पण करते, असं म्हणत त्यांनी बाबासाहेबांनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
सर्वत्र कोरोना संसर्गाची दाहकता वाढली आहे. या काळात तब्बल दीड वर्षानंतर मी घराबाहेर पडले आहे. ही कोरोनाची काळ कोठडी आहे. मी आता लोणावळ्यात राहतेय, मुंबईमध्ये नाही. लवकरच परत मुंबईला जाणार आहे, असं त्या म्हणाल्या. मी भाषण देणारी बाई नाही, आता जी माणसं भाषण देऊन गेली, ती भाषणातील थोर माणसं आहेत. सगळीकडे उभं राहून ते भाषण देऊ शकतात, असं त्या म्हणाल्या. मराठी लेखकांनी माझं आयुष्य समृद्ध केलं, तुमच्या चरणावर 1 लाख एक रुपये अर्पण करते, असं म्हणत त्यांनी बाबासाहेबांनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त पुण्यात एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) , मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar), महापौर मुरलीधर मोहोळ यासारख्या मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आशा भोसले यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांनी 1 लाख 1 रुपये अर्पण करत बाबासाहेबांनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.