आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्व करण्याचा मान पहिल्यांदाच लातूरच्या ‘आशा’ला!

| Updated on: Aug 23, 2023 | 4:01 PM

VIDEO | भारतीय जिम्नॅस्टिक संघाच्या प्रशिक्षकपदी लातूरची 'आशा', तर लातूरच्या 'लेकी'कडे भारतीय संघाचे नेतृत्व, मंगोलीया देशात सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी गुरु-शिष्याची जोडी सज्ज

लातूर, २३ ऑगस्ट २०२३ | मंगोलिया देशात होणाऱ्या ८ व्या ज्युनिअर- सिनिअर एशियन चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी लातूरच्या आशा झूंजे- भुसनुरे यांची निवड झाली आहे. मंगोलियात होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतीय वरिष्ठ संघात प्रशिक्षक आशा झूंजे- भुसनुरे यांची शिष्य लातूरची जिम्नॅस्ट सुषमा शिंदे हीची नुकतीच निवड झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्व करण्याचा मान पहिल्यांदाच लातूरच्या गुरु-शिष्याच्या या महिला जोडीला मिळत आहे. पुढील महिन्यात १५-१७ सप्टेंबर दरम्यान मंगोलिया देशात ८ व्या सिनिअर -ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिप स्पर्धा होत असून भारतीय संघाचे नेतृत्व लातूरची गुरू शिष्याची ही जोडी करणार आहे. त्यामुळे मंगोलीया देशात सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत लातूरची ‘आशा’ भारतीय जिम्नॅस्टिक संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्याने लातूरच्या गुरु – शिष्याची जोडी एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी सज्ज झाल्या आहेत.

Published on: Aug 23, 2023 04:01 PM
चांद्रयान-3 मोहीमेबाबत इस्रोचे नवे ट्विट; चांद्रयान नेमका किती वाजता चंद्रावर उतरणार?
योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश, पक्षप्रवेशाबाबत नेमकं काय म्हणाले?