VIDEO : Ashadhi Ekadashi 2021 | दुर्घटना टाळण्यासाठी मुळशी आपत्ती व्यवस्थापनाची बोट चंद्रभागेतीरी

| Updated on: Jul 20, 2021 | 1:00 PM

दरवर्षी मैलांचा प्रवास करुन वारकरी येथे स्नानासाठी येत असतात. पण, यंदा कोरोनामुळे त्याची परवानगी नाही. त्यामुळे चंद्रभागेचा काठ यावर्षी सुनासुना दिसतोय. मात्र, दुर्घटना टाळण्यासाठी मुळशी आपत्ती व्यवस्थापनाची बोट चंद्रभागेतीरी ठेवण्यात आली आहे. 

दरवर्षी पंढरपुरात आषाढी एकादशीला चंद्रभागा नदीच्या तिरावर भक्तांचा महापूर येत असतो. त्यामुळे मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती निशुल्क सेवा याठिकाणी देते. मात्र, यावर्षी चंद्रभागा नदीच्या पात्रात पुराचे पाणी असले तरी कोरोनामुळे भक्तांचा पूर आटला आहे. चंद्रभागा स्नानासाठी तिरावर वारकरीच नाहीत. दरवर्षी मैलांचा प्रवास करुन वारकरी येथे स्नानासाठी येत असतात. पण, यंदा कोरोनामुळे त्याची परवानगी नाही. त्यामुळे चंद्रभागेचा काठ यावर्षी सुनासुना दिसतोय. मात्र, दुर्घटना टाळण्यासाठी मुळशी आपत्ती व्यवस्थापनाची बोट चंद्रभागेतीरी ठेवण्यात आली आहे.

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 20 July 2021
Pandharpur | मानाची तिसरी पालखी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीची नगरप्रदक्षिणा सुरु