मन लागो रे लागो गुरू भजनी… संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा विहंगम ड्रोन दृश्य

| Updated on: Jun 19, 2024 | 4:26 PM

संत गजानन महाराज यांची पालखी पुढील एक महिना पायी प्रवास करून 15 जुलैला पालखी पंढरपूर येथे विठूरायाच्या चरणी दाखल होणार आहे. सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून पंढरपूरकडे रवाना झाली.

टाळ-मृदूंगाच्या गजरात जय गजानन श्री गजानन विविध अभंगांच्या नामघोषात शेगाव येथून संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. संत गजानन महाराज यांची पालखी पुढील एक महिना पायी प्रवास करून 15 जुलैला पालखी पंढरपूर येथे विठूरायाच्या चरणी दाखल होणार आहे. सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून पंढरपूरकडे रवाना झाली. संत गजानन महाराज संस्थेच्या यंदा दिंडीचे हे 55 वे वर्षे आहे. अशातच अकोला जिल्हातून वाशीम येथे जातांना पातूर तालुक्यात संत श्री गजानन महाराजांची पालखी पातुरच्या घाटातून जातांनाचे पालखीचे विहंगम दृश्य ड्रोनच्या माध्यमातून शूट करण्यात आले आहे. धिरज डोंगरे यांनी पातुरच्या घाटातून जातांनाचे पालखीचे विहंगम दृश्य शूट केले आहे. बघा व्हिडीओ

Published on: Jun 19, 2024 04:21 PM
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हे सर्व सरकार घडवतंय…मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर मनोज जरांगेंचा गंभीर आरोप