VIDEO : Nawab Malik यांच्या पत्रकार परिषदेनंतर Ashish Shelar यांची कडवट टीका
हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे सकाळी लवंगीसुद्धा लावू शकले नाहीत. त्यांनी लवंगी लावण्याचा प्रयत्न केला त्यातही हात पोळले. नवाब मलिक यांची हतबलता आणि घालमेल इतकी होती की हायड्रोजन सोडा त्यांना ऑक्सिजनची गरज लागेल की काय अशी अवस्था झाली आहे, अशा शब्दात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर टीका केली.
हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे सकाळी लवंगीसुद्धा लावू शकले नाहीत. त्यांनी लवंगी लावण्याचा प्रयत्न केला त्यातही हात पोळले. नवाब मलिक यांची हतबलता आणि घालमेल इतकी होती की हायड्रोजन सोडा त्यांना ऑक्सिजनची गरज लागेल की काय अशी अवस्था झाली आहे, अशा शब्दात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर टीका केली. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर आरोपांची सरबत्ती केली. मलिक यांच्या या आरोपानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला प्रत्युत्तर दिलं. हाजी हैदर, हाजी अराफतचा भाऊ, रियाझ भाटी, समीर वानखेडे, वसुली, आंतरराष्ट्रीय फोन अशी नावं आणि असे शब्द आणून त्यांनी खूप मोठं चित्रं निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.