Mumbai महापालिकेत केवळ BJPचं कमळ फुलणार – Ashish Shelar -TV9
आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी भाजपचे नेते आणि पदाधिकारी यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेला चारी मुंड्या चीत करत, महापालिकेवर भाजपचंच कमळ फुलवण्याचा संकल्प भाजपनं केला असल्याचं आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितलं.
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Election) अनुषंगाने आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून सत्ताधारी शिवसेनेकडून मुंबईतील 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आता भाजपही चांगलीच सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी भाजपचे नेते आणि पदाधिकारी यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेला चारी मुंड्या चीत करत, महापालिकेवर भाजपचंच कमळ फुलवण्याचा संकल्प भाजपनं केला असल्याचं आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितलं.
आशिष शेलार म्हणाले की, भाजपचे मुंबईतील प्रमुख पदाधिकारी, खासदार आमदारांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली. मुंबई महापालिका निवडणुका कधीही येवोत. सत्ताधाऱ्यांना चारी मुंड्या चित करण्यासाठीच्या मुंबईतील जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा या स्वरुपाचा सर्व ठोस कार्यक्रम ठरला आहे. त्याच्या रचना लावल्या, काही गोष्टींची उजळणी केलीय, आगामी कार्यक्रमांची तयारी सुरु झाली आहे. या सगळ्या चर्चेतून पुन्हा एकदा नव्या दमाने मुंबई महापालिकेत भाजपचंच कमळ फुलणार हा संकल्प घेऊन आम्ही बैठक केली.