VIDEO : Mohit Kamboj यांच्यावर भ्याड हल्ला, ठोकशाहीला ठोकशाहीने उत्तर देऊ- Ashish Shelar
मोहित कंबोज यांच्यावर झालेल्या हल्लावर आशिष शेलार म्हणाले की, ठोकशाहीला ठोकशाहीने उत्तर देऊ यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसैनिक खवळले असून त्यांनी मातोश्रीबाहेर घेराबंदी केली आहे.
मोहित कंबोज यांच्यावर झालेल्या हल्लावर आशिष शेलार म्हणाले की, ठोकशाहीला ठोकशाहीने उत्तर देऊ यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसैनिक खवळले असून त्यांनी मातोश्रीबाहेर घेराबंदी केली आहे. त्यामुळे वांद्रे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी नवनीत राणा आणि भाजपवर टीका केली आहे. आम्हाला राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या देऊ नका. राष्ट्रपती राजवट लावाच. आताच माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.