काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या अशोक चव्हाण यांचा जाणून घ्या राजकीय प्रवास, कधी लढवली पहिली निवडणूक?
काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वपदाचा राजीनामा....अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. तर काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या अशोक चव्हाण यांचा जाणून घ्या राजकीय प्रवास....माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे अशोक चव्हाण हे त्यांचे पुत्र.
मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४ : काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वपदाचा राजीनामा यासह आमदारकीचाही त्यांनी राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. तर काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या अशोक चव्हाण यांचा जाणून घ्या राजकीय प्रवास….माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे अशोक चव्हाण हे त्यांचे पुत्र. विद्यार्थी दशेपासूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली. १९८६ ते १९८९ मध्ये युवक काँग्रेसचे अशोक चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष होते. १९८७ ला पहिली लोकसभा पोटनिवडणूक लढवली यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता. तर १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यावेळी जनता दलाचे नवखे उमेदवार डॉ. व्यंकटेश काब्दे या विजयी झाल्यात. १९९२ मध्ये विधान परिषदेवर आमदार, १९९३ मध्ये राज्यमंत्री, १९९५ ते १९९९ दरम्यान काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस होते. बघा या पुढचा कसा होता राजकीय प्रवास?