Ashok Chavan | माझ्यावरचे आरोप हास्यास्पद, मानसिक संतुलन ढासळल्यासारखे बोंडे बोलतायत : अशोक चव्हाण

| Updated on: Nov 22, 2021 | 6:41 PM

त्रिपुरातील कथित घटनेनंतर अमरावती, मालेगाव आणि नांदेडमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं आहे. या दंगलीची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी आज भाजपकडून राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. नांदेडमध्येही माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी बोंडे यांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. बोंडेंच्या या टीकेला आता अशोक चव्हाण यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

नांदेड : त्रिपुरातील कथित घटनेनंतर अमरावती, मालेगाव आणि नांदेडमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं आहे. या दंगलीची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी आज भाजपकडून राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. नांदेडमध्येही माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी बोंडे यांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. बोंडेंच्या या टीकेला आता अशोक चव्हाण यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

दंगलीत आरोपी असलेल्या बोंडे यांनी इथे येईन शहाणपणा करु नये. त्यांचे माझ्यावरील आरोप हे हास्यास्पद आहे, मानसिक संतुलन बिघडल्यासारखे बोंडे बोलत आहेत, अशी खोचक टीका अशोक चव्हाण यांनी केलीय.

अनिल बोंडे यांचा नेमका आरोप काय?

नांदेडमध्ये झालेल्या दंगलीचे कटकारस्थान करणाऱ्यांना राजाश्रय असल्याचा खळबळजनक आरोप अनिल बोंडे यांनी केलाय. अमरावती, मालेगाव आणि नांदेड इथल्या दंगलखोरांवर कारवाई करा, अशी मागणी करत भाजपनं धरणं आंदोलन केलं. नांदेडमध्ये अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. यावेळी बोंडे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नांदेडमध्ये झालेली दंगल पूर्वनियोजित होती आणि दंगलखोरांना राजाश्रय दिला जात आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, असी मागणीही बोंडे यांनी केली आहे.

New Delhi | परमबीर सिंग यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा तर राज्य सरकारला मोठा झटका
Eknath Khadse | नाथाभाऊंना कुणीतरी स्पर्धक म्हणून गिरीश महाजनांना मोठ केलं जातंय : एकनाथ खडसे