Uadayanraje-Sambhajiraje | लोकशाहीच्या राजेंना जाब विचारा, आरक्षणाच्या मुद्द्यावर उदयनराजे रोखठोक
संभाजी छत्रपती यांनी आज उदयनराजे भोसले यांच्याशी मराठा आरक्षणावर 25 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर दोन्ही राजेंनी मीडियाशी संवाद साधून मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 338 बी नुसार आयोग स्थापन करावं लागेल.
संभाजी छत्रपती यांनी आज उदयनराजे भोसले यांच्याशी मराठा आरक्षणावर 25 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर दोन्ही राजेंनी मीडियाशी संवाद साधून मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 338 बी नुसार आयोग स्थापन करावं लागेल. मराठा समाज हा सामाजिक मागास असल्याचं सिद्ध करावं लागेल. हा अहवाल राज्यपालांना पाठवावा लागेल. राज्यपाल राष्ट्रपतींना पाठवतील, मग तो केंद्रीय मागास आयोगाकडे जाईल. त्यांना वाटल्यास ते आरक्षण देतील. आरक्षण मिळण्यासाठीचे मी दोन चार पर्याय दिले आहेत. त्यामुळे कोणत्या मार्गाने जायचं हे राज्यकर्त्यानेच ठरवावं, असं संभाजी छत्रपती म्हणाले.