BJP च्या नेत्यांनी Tipu Sultan चं नाव रस्त्यांना दिलं, Fadnavis यांना Aslam Shaikh यांचा टोला

| Updated on: Jan 26, 2022 | 8:42 PM

ज्या भाजप नेत्यांनी रस्त्यांना वीर टिपू सुलतान नाव दिलं, त्या भाजप नेत्यांचा फडणवीस राजीनामा घेणार का? असा सवाल अस्लम शेख यांनी फडणवीसांना विचारला आहे.

मुंबई : मुंबईच्या राजकारणात सध्या एकच नाव गाजतंय ते म्हणजे टिपू सुलतान. (Tipu Sultan) मालडमधील एका क्रिडा संकुलाच्या नावावरून हा सारा वाद पेटलाय. या नावाला भाजपसह (Bjp) बजरंग दलाने जोरदार विरोध केला. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि बंजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे. याच्या उद्घाटनानंतर अस्लम शेख यांनी मीडियाला प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार पलटवार केलाय. भाजपने रस्त्यांना टिपू सुलतान नाव दिलं, आता भाजप केवळ निवडणुका आल्यात म्हणून राजकारण करत आहे. ज्या भाजप नेत्यांनी रस्त्यांना वीर टिपू सुलतान नाव दिलं, त्या भाजप नेत्यांचा फडणवीस राजीनामा घेणार का? असा सवाल अस्लम शेख यांनी फडणवीसांना विचारला आहे. आता भाजपच्या पोटात अचानक का दुखू लागले? असाही सवाल त्यांनी विचारला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या नावावरून जोरदार पॉलिटिकल राडा सुरू आहे.

Published on: Jan 26, 2022 08:42 PM
सत्तेसाठी निर्लज्जतेचा कळस, मालाडमधील क्रीडा संकुलाच्या नावावरुन Devendra Fadnavis यांचं ट्विट- Tv9
Uddhav Thackeray यांच्या उपस्थितीवर टीका करणारे नामर्द, Sanjay Raut यांचं पडळकरांना प्रत्युत्तर- Tv9