VIDEO : Kirit Somaiya | माजी मंत्री अस्लम शेख यांनी मढ मार्वेमध्ये 1 हजार कोटींचा स्टुडिओ घोटाळा केला
काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री आणि मुंबईचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अस्मम शेख यांनी कोरोना काळात मालाड पश्चिमेकडील मढच्या समुद्रात सर्व नियमांना धाब्यावर बसवत बांधकामास मदत केली.
काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री आणि मुंबईचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अस्मम शेख यांनी कोरोना काळात मालाड पश्चिमेकडील मढच्या समुद्रात सर्व नियमांना धाब्यावर बसवत बांधकामास मदत केली. त्यांनी मढ परिसरात तब्बल 28 फिल्म स्टुडियोचे कमर्शियल बांधकाम सुरू केले आहे. यातील पाच स्टुडियो हे ‘सीआरझेड झोनमध्ये येत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच या प्रकरणात कोट्यवधीचा घोटाळाही झाल्याचे त्यांनी म्हटले होते. आता याच प्रकरणात माजी मंत्री अस्लम शेख यांना पर्यावरण विभागाने नोटीस पाठवली आहे.
Published on: Aug 06, 2022 02:34 PM