Special Report | आसाममधील ‘लाखमोलाचा चहा’, 99999 रुपयात विकली गेली 1 किलो चहा पावडर
चहामधील प्रमुख आणि महत्त्वाचा घटक म्हणजे चहा पावडर. ही चहा पावडर जो जो आपल्या आर्थिक क्षमेतेनुसार घेतो. मात्र एका ठिकाणी एक किलो चहा पावडर जवळपास 1 लाख रुपयांच्या किंमतीने विकली जात आहे.
चहा हा परदेशी आहे. मात्र, जगात सर्वाधिक चहाचं सेवन सध्या (International Tea Day) भारतात केलं जातं. चहामधील प्रमुख आणि महत्त्वाचा घटक म्हणजे चहा पावडर. आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्याला परवडेल अशी चहा पावडर विकत घेतो. मात्र एका ठिकाणी एक किलो चहा पावडर जवळपास 1 लाख रुपयांच्या किंमतीने विकली जात आहे. गुवाहाटीतील जीएटीसी केंद्रात मंगळवारी एक किलो गोल्डन बटरफ्लाय चहाला (Golden Butterfly Tea) तब्बल 99 हजार 999 रुपये इतका विक्रमी भाव मिळाला आहे. गुवाहाटी टी ऑक्शन सेंटरमध्ये हा लिलाव पार पडला. या चहाचे ब्रँडिंग ‘मनोहरी गोल्ड’ नावाने (Manohari Gold Tea) केलं जातं. मनोहरी गोल्ड टीने मंगळवारी गुवाहाटी टी ऑक्शनमध्ये स्वत:चाच विक्रम मोडित काढला. गेल्या वर्षी या चहाला एक किलोमागे 75 हजार रुपये इतका दर मिळाला होता.
Published on: Dec 14, 2021 11:30 PM