उस्मानाबाद, औरंगाबादनंतर आता अलिबागचं नाव बदलणार? राहुल नार्वेकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अलिबाग शहराचं नाव मायनाक नगरी करा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. मायनाक भंडारी यांच्या पराक्रमाचा दाखल देत अलिबागच्या नामांतराची मागणी राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. काय लिहिले आहे पत्रात बघा व्हिडीओ?
उस्मानाबाद, औरंगाबाद, या शहरांपाठोपाठ आता अलिबाग शहराचं नाव बदलावं अशी मागणी करण्यात आली आहे. अलिबाग शहराचं नाव मायनाक नगरी करा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. मायनाक भंडारी यांच्या पराक्रमाचा दाखल देत अलिबागच्या नामांतराची मागणी राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासह अलिबागमध्ये मायनाक भंडारींचं भव्य स्मारक उभारण्याची मागणीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे. मात्र अलिबागचे नाव बदलण्याच्या या मागणीला अलिबाग शहरामधूनच कडाडून विरोध होत आहे. स्वराज्याचे आरमार आणि त्यासंदर्भातील इतिहास यातील मायनाक भंडारी यांच्या या पराक्रमाचा ऐतिहासिक संदर्भ घेता अलिबाग शहरासह तालुक्याचे ‘मायनाक नगरी’हे नामकरण करावे, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहीलेल्या पत्रात नमूद केले आहे.