विधान परिषदेसाठी हॉटेल पॉलिटिक्स, विधानपरिषद निवडणुकीत कोणाची मतं फुटणार?
विधानपरिषद निवडणुकीसाठी ११ जागांसाठी १२ उमेगवार रिंगणात आहेत. त्यामुळे एका-एका आमदारांचं मतं महत्त्वाचं आहे. त्यातच गुप्त मतदान होणार असल्याने महायुती आणि महाविकास आघाडी आणि घटकपक्ष आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत. कोणा-कोणाचे आमदार कुठे थांबणार?
येत्या काही दिवसांत विधानपरिषदेची निवडणूक आहे. त्यापूर्वी पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स सुरू होणार आहे. कारण गुप्त मतदान असल्याने मतं फुटण्याची दाट शक्यता आहे. तर तीन मतं असणाऱ्या बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी शिंदे-फडणवीस यांचीही भेट घेतली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी ११ जागांसाठी १२ उमेगवार रिंगणात आहेत. त्यामुळे एका-एका आमदारांचं मतं महत्त्वाचं आहे. त्यातच गुप्त मतदान होणार असल्याने महायुती आणि महाविकास आघाडी आणि घटकपक्ष आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत. मविआतील ठाकरे गटाचे आमदार लोअर परेलच्या ग्रँड आयटीसी हॉटेलमध्ये थांबणार आहेत. यासह काँग्रेसही आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार असून शरद पवार त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार नसल्याचे समजतेय तर महायुतीतील तीनही पत्र आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहे.