विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार, नेमकं कोण पडणार? कुणाला किती मतांची गरज?

| Updated on: Jul 11, 2024 | 12:27 PM

विधानपरिषद निवडणुकीत 11 जागा आहेत आणि 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित आहे. या निवडणुकीत लहान-लहान राजकीय पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत आहेत. दरम्यान, या सगळ्यांमध्ये कोण आहे गेम चेंजर बघा व्हिडीओ...

भाजपकडे स्वतःचे 103 अपक्ष आणि इतर 8 असे 111 आमदार आहेत. त्यामुळे 23 कोटा असल्याने 4 आमदार सहज निवडणून येतील. पण पाचव्या उमेदवाराला निवडणून आणण्यासाठी भाजपला चार मतांची गरज आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडे स्वतःचे 37 आणि अपक्ष 06 असे 43 आमदार आहेत. शिंदेंचे दोन उमेदवार उभे असून दुसऱ्या उमेदवारासाठी तीन मतांची गरज आहे. अजित दादांच्या राष्ट्रवादीकडे स्वतःचे 40 आणि इतर 03 असे 43 आमदार आहेत. दुसऱ्या उमेदवारासाठी तीन मतांची गरज आहे. काँग्रेसकडे 37 आमदार असल्याने प्रज्ञा सातव हे सहज निवडून येतील. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे स्वतः 15 आणि इतर 1 असे 16 आमदार आहेत. म्हणजे आणखी सात मतांची गरज आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे स्वतःचे 12 आमदार असून त्यांनी शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिलाय तर 13 मतांची गरज आहे. या निवडणुकीत गुप्त मतदान होत असल्याने क्रॉर व्होटिंगची दाट शक्यता आहे. यामध्ये मोठ्या पक्षांना छोट्या पक्षांच्या मतांची किंमत असणार आहे

Published on: Jul 11, 2024 12:27 PM
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरून आजपासून ‘या’ वेळात प्रवास करता येणार नाही, कारण नेमकं काय?
‘या माझ्या रेड्यावर…’, डोंबिवली रेल्वे स्थानकात यमराज, नेमकं काय केलं प्रवाशांना आवाहन?