महायुतीचं सरकार येणार अन् आपल्याला मोठं पद मिळणार, त्रिवार हुंकार देत अजितदादा नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Nov 01, 2024 | 12:31 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत त्यांनी गाव भेट दौऱ्याचे आयोजन केले आहे. या दौऱ्याच्या नियोजना दरम्यान, तब्बल 59 गावांना भेटी अजित पवार देणार आहेत.

बारामतीमध्ये नागरिकांशी संवाद साधताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार हे सध्या बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत आहेत. यादरम्यान, ते ५९ गावांचा दौरा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार येणार आणि आपल्याला मोठं पद मिळणार असं अजित पवार म्हणाले. ते आज बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावामध्ये प्रचारादरम्यान बोलत होते. ‘विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने बारामती तालुक्याचा विकास आणि अधिक फायदा झाला पाहिजे. उद्या काही झालं तरी राज्यात महायुतीचे सरकार येणार… येणार… येणार. ते सरकार आपल्यानंतर आपल्याला मोठं पद मिळणार… मिळणार… मिळणार…’, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी असं वक्तव्य करत एकप्रकारे राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर आपला दावा असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केल्याचे पाहायला मिळाले. यानंतर उपस्थितांमधून तुम्ही मुख्यमंत्री होणार अशा घोषणा करण्यात आल्यात. यावर अजित पवार हसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महायुती सरकारच्या योजना मतदारांपर्यंत पोहोवण्याच्या सूचना केल्यात.

Published on: Nov 01, 2024 12:31 PM
‘माल’ संबोधल्याने शायना एनसी यांचा राग अनावर, शिवसेना उबाठाच्या खासदारासह नेतृत्वाला धरलं धारेवर
‘ईदचं लायटिंग असतं, हिरवे कंदिल लागले असते, तर तुम्ही…’, मनसे नेत्याचा उद्धव ठाकरे गटावर थेट हल्लाबोल