विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न, कारण नेमकं काय?

| Updated on: Nov 05, 2024 | 5:38 PM

विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना किनवटचे रासप उमेदवार गोविंद जेठेवाडा यांच्याकडून विषारी औषध प्राशन करुन स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न झाला आहे. संबंधित घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे किनवट विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गोविंद जेठेवाडा यांच्याकडून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची मोठी बातमी समोर येत आहे. जेठेवाडा हे विधानभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. मात्र गोविंद जेठेवाडा यांच्याकडून टोकाचा निर्णय घेण्यात आला आहे. गोविंद जेठेवाडा यांच्यावर विश्वास दाखवत रासपचे प्रमुख नेते महादेव जानकर यांनी त्यांना किनवट विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभेचं तिकीट दिली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्याकडून प्रचारही सुरू कऱण्यात आला होता. मात्र असे असताना गोविंद जेठेवाडा यांनी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद जेठेवाडा यांच्याकडून विषारी औषध प्राशन करुन स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न झाला आहे. गोविंद जेठेवाडा यांनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर त्यांना त्वरीत उपचारांसाठी तेलंगणाच्या आदिलाबाद येथे हलवण्यात आलं आहे. मात्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना गोविंद जेठेवाडा यांनी असा टोकाचा निर्णय घेण्याचा का प्रयत्न केला? यामागे काही राजकीय किंवा वैयक्तिक कारण आहे का? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जातोय.

Published on: Nov 05, 2024 05:38 PM
Sharad Pawar : पवारांची राजकारणातून निवृत्ती? म्हणाले, ’14 निवडणुका लढल्या, तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता…’
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार, म्हणाले, ‘खोडा घालणाऱ्यांना जोडा…’