उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, वांद्र्यातील ‘मातोश्री’ परिसरात महायुतीची जोरदार बॅनरबाजी

| Updated on: Nov 12, 2024 | 1:00 PM

मुंबईतील बांद्रा या ठिकाणी मातोश्री परिसर आहे. या मातोश्री परिसरात महायुतीने जोरदार बॅनरबाजी करत होर्डींगच्या माध्यमातून मोठं शक्ती प्रदर्शन केलं आहे. मातोश्री परिसरात महायुतीकडून करण्यात आलेल्या बॅनरवर नेमकं काय म्हटलं? बघा व्हिडीओ

येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचाराचा धडाका सुरूये. अशातच मुंबईतील बांद्रा येथील मातोश्री परिसरात महायुतीने जोरदार बॅनरबाजी केली आहे. महायुतीकडून करण्यात आलेल्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे एका साईडला फोटो तर दुसऱ्या साईडला अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे फोटो दिसताय. त्या फोटोंच्या खालोखालच “होय पुन्हा महायुतीचंच सरकार येणार” असा दावा करण्यात आलाय. मातोश्रीच्या बाहेर लागलेल्या बॅनरवर सरकारने केलेल्या कामाचा हवालाही दिला गेला आहे. केलंय काम भारी, आता पुढची तयारी, असं म्हणत थेट उद्धव ठाकरे गट शिवसेनेला डिवचण्याचं काम या बॅनरच्या माध्यमातून होत असल्याची चर्चा सध्या मातोश्री परिसरात सुरू आहे. ‘वयोश्री योजनेसह तीर्थदर्शन योजनेचा आधार… जेष्ठांची मायेनं काळजी घेणार… विकासाचं निशाण म्हणजे लाडकं धनुष्यबाण’ असं म्हणत महायुतीकडून मातोश्री बाहेर जोरदार बॅनरबाजी करण्यात आली असून मतदारांना महायुतीतील शिवसेनेला मतं देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Published on: Nov 12, 2024 01:00 PM
Raosaheb Danve Video : कार्यकर्त्यांनो… नीट बघा नेते काय करतात! रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ व्हायरल
उद्धव ठाकरेंच्या ‘या’ उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन