Eknath Shinde Shivsena : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार, नेमकं काय झालं? कुठे घडली घटना?

| Updated on: Nov 20, 2024 | 9:56 AM

श्रीरामपूरमध्ये एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराच्या गाडीवर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेऊन घरी परतत असताना ही गोळीबार झाल्याची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या पाच अज्ञात हल्लेखोरांकडून भाऊसाहेब कांबळेंवर गोळीबार करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर नुकताच अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये अनिल देशमुख जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या घटनेचा पोलिसांकडून सध्या तपास सुरु आहे. अशातच आता श्रीरामपूरमध्ये एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराच्या गाडीवर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेऊन घरी परतत असताना ही गोळीबार झाल्याची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या पाच अज्ञात हल्लेखोरांकडून भाऊसाहेब कांबळेंवर गोळीबार करण्यात आला. सुदैवाने भाऊसाहेब कांबळे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. आज विधानसभा निवडणुकीचे मतदान होतेय. दरम्यान, काल मतदारांच्या गाठीभेटी घेऊन घरी परतत असताना भाऊसाहेब कांबळे यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

Published on: Nov 20, 2024 09:56 AM
विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? भाजपच्या कोणत्या नेत्यानं दिली टीप? हितेंद्र ठाकूरांचं सनसनाटी वक्तव्य
Ajit Pawar : अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामतीच्या काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क