शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले…

| Updated on: Oct 22, 2024 | 5:49 PM

येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात २८८ मतदारसंघांसाठी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांकडून कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे याची तयारी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या ३० ते ४० जणांच्या उमेदवारीची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात असताना शिवसेनेच्या प्रवक्त्याकडून मोठी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिली यादी आज जाहीर होणार असल्याची माहिती शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची दुसरी यादी येत्या २६ ऑक्टोबर रोजी दुसरी यादी जाहीर होणार असल्याचेही संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. ‘सर्वच जागांवर जवळपास युतीशी चर्चा झाली आहे. महायुतीमधील भाजप या पक्षाकडून ९९ उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर करण्यात आली आहे. आमची पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार आहे. आणि २६ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील दुसरी यादी जाहीर होणार आहे.’, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली. ते पुढे असेही म्हणाले, आमच्यामध्ये आणि आमच्या महायुतीमध्ये कोणताही वाद पाहायला मिळणार नाही, असेही संजय शिरसाट म्हणाले.

Published on: Oct 22, 2024 05:49 PM
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, ‘या’ 3 जणांची उमेदवारी फिक्स
Eknath Shinde Candidate List : शिंदेंच्या शिवसेनेची यादी जाहीर, ‘या’ 45 जणांना उमेदवारी, बघा पहिल्या यादीत कोणाला संधी?