महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटला? अमित शाहांनी ठरवला फॉर्म्युला, कोणाच्या वाटेला किती जागा?

| Updated on: Oct 20, 2024 | 11:18 AM

दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक झाली. याबैठकीत महायुतीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याची चर्चा आहे.

Follow us on

दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या जागांचा तिढा जवळपास संपला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप १५५ जागा लढण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांना ७८ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ५५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर ज्या जागांवर तिढा आहे त्या जागांबाबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी बसून सोडवाव्यात अशा सूचना देण्यात आल्याचं कळतंय. दरम्यान, मुंबईत भाजप १८ जागा, शिंदेंची शिवसेना १६ जागा आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी दोन जागांवर लढू शकते. तर महाविकास आघाडीबद्दल सांगायचे झाले तर नाना पटोले आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातील वाद पाहता. तात्काळ दिल्लीतून सूत्र हालली. काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथल्लांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर नाना पटोले यांच्या नेतृत्वात जागा वाटपाची बैठक होईल हे निश्चित झाले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…