उद्धव ठाकरेंच्या ‘या’ उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन

| Updated on: Nov 12, 2024 | 1:57 PM

महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने सर्वच नेत्यांकडून प्रचाराचा धडाका लावण्यात आलाय. सध्या सत्ताधारी महायुतीकडून ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हे तो सेफ हैं’ या मुद्यांभोवती प्रचार केंद्रीत केला जात असताना राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप या दोन्ही राजकीय पक्षांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सडकून टीका केली जात आहे. अशातच उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाच्या विचारापासून लांब गेले असून त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्वाची विचारधारा सोडल्याची टीकाही त्यांच्यावर केली जात आहे. अशातच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मौलाना यांनी आवाहन केलं आहे. इतकंच नाहीतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार सुनील प्रभू आणि आमदार सचिन अहिर मौलानांसोबत बसलेले दिसले. मुंबईतील दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुनील प्रभू यांना मतदान करण्याचे आवाहन मौलाना यांनी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे दिंडोशीचे उमेदवार सुनील प्रभू आणि आमदार सचिन अहिर हे दोघे दिसत आहेत. दरम्यान, काल रात्रीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिंडोशी येथे झालेल्या प्रचारसभेतून शिवसेनेच्या उर्दू पत्रकावर आणि वर्सोवा विधानसभेत मुस्लिम उमेदवार उभे केल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर सडकून टीका केली होती.

Published on: Nov 12, 2024 01:56 PM
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, वांद्र्यातील ‘मातोश्री’ परिसरात महायुतीची जोरदार बॅनरबाजी
रावसाहेब दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् शरद पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले, ‘… त्याचं हे लक्षण’