Saroj Ahire : ‘माझ्या विरोधात षडयंत्र अन्…’, अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे यांच्या डोळ्यात पाणी

| Updated on: Nov 05, 2024 | 4:58 PM

नाशिकच्या देवळाली मतदारसंघात महायुतीत गोंधळ निर्माण झाला असून देवळाली येथे महायुतीतच सामना रंगताना दिसणार आहे. अजित पवार गटाकडून सरोज अहिरे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राजश्री अहिरराव या उमेदवार आहेत.

Follow us on

नाशिकमधील देवळाली मतदारसंघात सरोज आहिरे यांच्या प्रचारास आजपासून सुरूवात झाली आहे. सरोज आहिरे या देवळाली मतदारसंघातील अजित पवार गट राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. नाशिकच्या देवळाली मतदारसंघात महायुतीत गोंधळ निर्माण झाला आहे. देवळालीमध्ये शिंदे गटासोबत अजित पवार गटाचे उमेदवारही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अजित पवार गटाकडून सरोज अहिरे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राजश्री अहिरराव या उमेदवार आहेत. दरम्यान, सरोज अहिरे प्रचारादरम्यान ‘tv9 मराठी’ शी बोलताना सरोज आहिरे या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ‘जनतेचं मिळणारं प्रेम या भावना शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. या जनतेने माझ्याकडे काहीच नसताना मला पदरात घेतलं त्यामुळे या जनतेची ऋणी आहे. पदं येतील जातील पण हे प्रेम आयुष्यभर टिकवणार आहे. ज्या आशीर्वादाला आहिरे कुटुंब मुकलो होतो आता आम्ही प्रचंड समाधानी आहे’, असं म्हणत सरोज अहिरे यांचे डोळे पाणावलेत. पुढे त्या असंही म्हणाल्यात, ‘2019 साली जसा प्रचार झाला तसाच प्रचार यंदा जनतेकडून सुरू आहे. स्वतःच्या गाड्या, वाहनं आणि जेवणाचे डब्बे सोबत घेऊन नागरिक प्रचाराला आलेत. हीच जनता माझ्या भोवती जे षडयंत्र रचलं होतं त्याला नक्कीच उत्तर देईल’, असा विश्वासही यावेळी सरोज अहिरे यांनी व्यक्त केला.