Maharashtra Vidhan Sabha Election : राज्यात दिवसभरात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला मतदानाचा हक्क?

| Updated on: Nov 21, 2024 | 12:55 PM

राज्यात २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या २३ नोव्हेंबर म्हणजे शनिवारी लागणार आहे. त्यावेळी जनतेचा कौल नेमका कोणाला याचा फैसला समोर येणार आहे. राज्यात काल दिवसभरात ६५.०२ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे

महाराष्ट्रात काल २८८ विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या मतदानापेक्षा विधानसभा निवडणुकीला मतदारांनी चांगलं मतदान केल्याचे पाहायला मिळाले. राज्यात २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या २३ नोव्हेंबर म्हणजे शनिवारी लागणार आहे. त्यावेळी जनतेचा कौल नेमका कोणाला याचा फैसला समोर येणार आहे. राज्यात काल दिवसभरात ६५.०२ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत राज्यातील मतदानाची टक्केवारी ही ४ टक्क्यांनी वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ७६.२५ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. तर मुंबईत सर्वाधिक कमी ५२.०७ टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे. करवीर मतदारसंघात सर्वाधिक ८४. ७९ टक्के इतकं मतदान झालं आहे. अहिल्यानगर, अकोला, अमरावती, संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड या जिल्ह्यात २०१९ च्या तुलनेत यंदा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. बघा तुमच्या भागात किती टक्के झालं मतदान?

Published on: Nov 21, 2024 12:55 PM