शिवसेनेच्या ‘त्या’ 40 आमदारांना मुदतवाढ, अपात्रतेचा मुद्दा पुन्हा लांबणीवर!
VIDEO | 'त्या' 40 आमदारांना मुदतवाढ, खुलासा किंवा उत्तर देण्यासाठी आता शेवटची संधी? पुढे काय होणार?
मुंबई : आमदार अपात्रतेसाठी शिवसेनेच्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे आमदारांना खुलासा करण्यासाठी शेवटची संधी असणार आहे. शिंदे गटातील आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा यामुळे लांबणीवर गेला आहे. विधानसभा अध्यक्षांनी दोन आठवड्याची मुदत वाढ दिल्याने आता शिंदे गटातील आमदारांना खुलासा करण्यासाठी किंवा कोणतेही उत्तर देण्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनानंतर या प्रकरणावरीव सुनावणीस सुरूवात होणार आहे. नोटीसीचा खुलासा दिलेल्या आमदारांना पुरावे सादर करावे लागणार असल्याचेही सांगितले जात आहे. सोमवारी राहुल नार्वेकर यांनी आढावा बैठक घेतली आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी सुरू होण्यापूर्वी शिंदे यांच्या नेतृत्वातील ४० शिवसेना आमदार आणि उद्धव ठाकरे गटातील १४ आमदारांना उत्तर दाखल करण्यास सांगितले. मात्र आता शिंदे गटातील आमदारांना २ आठवड्यांची मुदतवाढ मिळाली आहे.