महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय तरी काय? राहुल नार्वेकर यांची भेट घेतली अन् अशोक चव्हाण नॉट रिचेबल

| Updated on: Feb 12, 2024 | 1:31 PM

अशोक चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ नाव असून त्यांची नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर चांगली पकड आहे. मात्र आता अशोक चव्हाण नॉटरिचेबल झाल्यानंतर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार अशून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.

Follow us on

मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४ : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली तर या भेटीनंतर अशोक चव्हाण नॉटरिचेबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, राहुल नार्वेकर यांच्याशी झालेल्या भेटीवर ती सदिच्छा भेट असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले होते. अशोक चव्हाण यांना आपल्या घरातूनच राजकारणाच बाळकडू मिळालं होतं. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर अशोक चव्हाण यांना 2008 साली मुख्यमंत्रीपदाची संधीही मिळाली होती. अशोक चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ नाव असून त्यांची नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर चांगली पकड आहे. मात्र आता अशोक चव्हाण नॉटरिचेबल झाल्यानंतर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार अशून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. यासोबतच अशोक चव्हाण यांनी विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.