शिवसेनेच्या ‘त्या’ आमदारांचा उद्या फैसला, कोणाचे MLA अपात्र, शिंदेंचे की ठाकरेंचे… राहुल नार्वेकर देणार निकाल

| Updated on: Jan 09, 2024 | 10:42 AM

शिवसेनेच्या 'त्या' १६ आमदाराचं काय होणार याचा पुढच्या ४८ तासांत फैसला होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे लागले आहे. १० जानेवारी बुधवारी दुपारी ४ वाजेनंतर निकाल लागण्याची शक्यता आहे. यावेळी राहुल नार्वेकर निकालातील ठळक मुद्दे वाचतील

मुंबई, ९ जानेवारी २०२४ : शिवसेना अपात्रता प्रकरणावर बुधवारी निकाल येणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वतः यासंदर्भातील निकाल वाचतील. कुणाचे आमदार अपात्र होणार एकनाथ शिंदे यांचे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे…? शिवसेनेच्या ‘त्या’ १६ आमदाराचं काय होणार याचा पुढच्या ४८ तासांत फैसला होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे लागले आहे. १० जानेवारी बुधवारी दुपारी ४ वाजेनंतर निकाल लागण्याची शक्यता आहे. यावेळी राहुल नार्वेकर निकालातील ठळक मुद्दे वाचतील. त्यानंतर सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटाना देण्यात येणार आहे. हा निकाल दोन्ही गटासाठी महत्त्वाचा आहे. शिंदेसह १६ आमदार अपात्र झाले तर सरकारच कोसळेल. तर कारण अपात्रतेच्या यादीत स्वतः मुख्यमंत्री आहेत. शिंदेंसह १६ आमदार वैध ठरवले तर मग सरकारला धोका नाही. पण निकाल ठाकरेंच्या विरोधात आले तर ठाकरेंचे १४ आमदार आपात्र होणार…बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jan 09, 2024 10:42 AM
Boycott Maldives : पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपचं ट्वीट केलं अन् मालदिवला झोंबलं, पण का?
मुंबईत उपोषण होणार की नाही? मनोज जरांगे पाटलांविरोधात हायकोर्टात याचिका, काय म्हटलंय याचिकेत?